सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवर कृषीपंप
By Admin | Updated: April 17, 2017 19:19 IST2017-04-17T19:19:30+5:302017-04-17T19:19:30+5:30
वाशिम: सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवरील कृषीपंप बसवून त्याद्वारे सिंचन करण्याचा प्रकार खिर्डा येथे सुरू आहे.

सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवर कृषीपंप
वाशिम: सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवरील कृषीपंप बसवून त्याद्वारे सिंचन करण्याचा प्रकार खिर्डा येथे सुरू आहे. विशेष म्हणजे सदर कृषीपंप काढण्याची सूचना ग्रामपंचायतकडून करण्यात आल्यानंतरही सदर व्यक्तीने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतच्यावतीने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे.
मालेगाव तालुक्यातील खिर्डा येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील सर्व विहिरी आटल्या असून, सार्वजनिक नळ योजनेच्या विहिरीवर नो मोटारपंप बसवून गावात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या विहिरीलाही पुरेसे पाणी नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे. असे असतानाही एका व्यक्तीने या विहिरीवर आणखी एक मोटारपंप बसवून विहिरीचे पाणी सिंचनासाठी वापरणे सुरू केले आहे. याबाबत ग्रामपंचायतने सदर व्यक्तीला मोटारपंप काढण्याची सूचना करूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केल. या बाबत तहसील कायर्त्तलयात तक्रार करूनही काहीच फायदा झाला नसल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर व्यक्तीने सार्वजनिक नळयोजनेच्या विहिरीवर बसविलेला मोटारपंप काढून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.