सार्वजनिक हाेलिकाेत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:39 IST2021-03-24T04:39:35+5:302021-03-24T04:39:35+5:30

काेराेना संसर्गामुळे कोणत्याही सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रमास निर्बंध असल्यामुळे रविवार २८ मार्च रोजी होणारा कार्यक्रम स्त्री-पुरुष प्रेक्षकांची प्रचंड गर्दी लक्षात ...

Public Helicopters canceled | सार्वजनिक हाेलिकाेत्सव रद्द

सार्वजनिक हाेलिकाेत्सव रद्द

काेराेना संसर्गामुळे कोणत्याही सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रमास निर्बंध असल्यामुळे रविवार २८ मार्च रोजी होणारा कार्यक्रम स्त्री-पुरुष प्रेक्षकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता व फिजिकल डिस्टन्सिंगच्या शासनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी आयोजन समितीच्यावतीने कार्यक्रम रद्द करण्याचे सर्वानुमते घोषित करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून जि.प. माध्यमिक विद्यालय, मंगरुळपीर या ठिकाणी सदर दिवशी गर्दी करू नये, असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने सुभाषराव ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, रामकृष्ण पाटील, राजेंद्र मिसाळ, राजेश ठाकरे, अनिल गावंडे, संजय मिसाळ, मोहनसिंह ठाकूर, तानाजी आंबेकर, प्रवीण ठाकरे, सुधीर बेंद्रे, चंद्रकांत पाकधने, गिरीशकुमार बाहेती, उमेश गावंडे, संजय भोयर, जयकुमार गुप्ता, आशिष खोडके, सुनील किरसान, सुरेश गावंडे, राम ठाकरे मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, शिवरत्न मित्र मंडळ , सर्व धर्म मित्र मंडळ, समस्त कविमंच, आयोजक राम ठाकरे, जिल्हाध्यक्ष अंकुर साहित्य संघ दीपक राऊत, अध्यक्ष होलिकोत्सव समितीचे सचिन मांढरे, प्राचार्य दिलीप आंबेकर यांनी केले आहे.

Web Title: Public Helicopters canceled