पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ‘मजिप्रा’कडून जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:07 IST2017-10-11T16:06:20+5:302017-10-11T16:07:15+5:30

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ‘मजिप्रा’कडून जनजागृती!
वाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. दरम्यान, अपुºया पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत ‘मजिप्रा’कडून गावागावात प्रभावीरित्या जनजागृती केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बंद पडलेल्या १० पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी भरीव निधी मंजूर झाला. त्यातून सद्या प्रथम प्राधान्याने योजना पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच ज्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुस्थितीत आहेत, त्याव्दारे ग्रामीण जनतेला पाणीपुरवठा केला जात असून गरज असेल तरच पाणी घ्या, पाण्याचा अपव्यय टाळा, गावातील विहिरी, हातपंपांना पाणी असल्यास आधी त्याचा वापर करा, अशा पद्धतीने ‘मजिप्रा’कडून जिल्ह्यातील गावकºयांचे उद्बोधन केले जात असून त्यास सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विद्यमान प्रभारी कार्यकारी अभियंता के. के. जीवने यांनी दिली.