राजुरा येथे उष्माघाताबाबत जनजागृती

By Admin | Updated: April 22, 2017 18:26 IST2017-04-22T18:26:44+5:302017-04-22T18:26:44+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उष्माघातबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली.

Public awareness about heat wave at Rajura | राजुरा येथे उष्माघाताबाबत जनजागृती

राजुरा येथे उष्माघाताबाबत जनजागृती

राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे उष्माघाताबाबत जनजागृती करण्यात आली. गृहभेटी घेऊन उष्माघापासून स्वत:चा बचाव कसा करावा, याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उष्माघातबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली. त्यानुसार मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या राजुरा उपकेंद्रातील आरोग्य परिचारीका ज्योती घोडके, सेविका रेखा भोंबळे, आरोग्य सेवक कुरेशी, आशा स्वयंसेविका वंदना हिवराळे, रेखा सोनोने, अंगणवाडी सेविका शोभा अढाव यांनी घरोघरी फिरुन नागरिकांना उष्माघात होण्यामागची कारणे, उष्माघाताची लक्षणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय व उपचाराची माहिती ग्रामस्थांना दिली. यावेळी परिचारीका घोडके यांनी सांगितले की, वाढत्या तापमानात कष्टाची कामे टाळावी, उष्माघात शोधुन घेणारे कपडे न वापरता पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा, जलसंजीवणीचा वापर करुन पाणी व शरबत भरपुर पिणे, उन्हात जाताना चष्मा, टोपी व रुमालाचा वापर केल्यास करावा आदी खबरदारीमुळे उष्माघात टाळता येवू शकतो, अशी माहिती दिली. सोबतच उष्माघातावरील लक्षणे व उपचाराबाबतची सविस्तर माहितीही ग्रामस्थांना दिली.

Web Title: Public awareness about heat wave at Rajura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.