आवश्यक सेवा तात्काळ पुरवा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:48 IST2021-09-05T04:48:26+5:302021-09-05T04:48:26+5:30
: वंचित बहुजन आघाडीचे नगर पंचायत ला निवेदन मालेगाव : शहराला विविध समस्यांनी ग्रासले असून मूलभूत व आवश्यक सेवा ...

आवश्यक सेवा तात्काळ पुरवा अन्यथा आंदोलन
: वंचित बहुजन आघाडीचे नगर पंचायत ला निवेदन
मालेगाव : शहराला विविध समस्यांनी ग्रासले असून मूलभूत व आवश्यक सेवा पुरविण्यात दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मालेगाव शहर अध्यक्ष जावेदखान पठाण ह्यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यावर्षी झालेल्या जास्त पावसामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचलेले आहेत. शहरामध्ये सर्वत्र चिखल झालेला आहे,नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्यामुळे,घाण कचरा उचलला जात नसल्यामुळे मच्छर व डास मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने व त्यांच्या प्रादुर्भावामुळे रुग्णाचे प्रमाण वाढलेले आहे. शहरामध्ये डासांना नष्ट करणारे औषधासह धूर फवारणी करण्याची मागणी तसेंच बऱ्याच वाॅर्डामध्ये रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला चिखल झालेला आहे त्या त्या ठिकाणी तात्काळ मुरूम टाकण्यात यावा, शहरातील कित्येक विद्युत खांबावरील दिवे गेलेले आहेत, त्या भागात सर्वत्र अंधार असतो. तसेच सर्वच स्मशानभूमीमध्ये गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला साप व सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होऊ शकतो .त्यामुळे ह्या सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर मालेगाव शहर अध्यक्ष जावेदखान पठाण, तालुका महासचिव शेख कदिरभाई, युवक आघाडीचे अजीम चौधरी, फय्याज शाह, ॲड. के. एन .साळुंके, देवानंद कांबळे, कांचनबाई कांबळे ह्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
040921\img-20210903-wa0061.jpg
दनजडजडज