शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शिधापत्रिका धारकांना प्रचलीत पध्दतीनुसार धान्य द्या - दक्षता समिती सदस्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 4:01 PM

वाशिम - रेशन दुकानदारांकडून आधारकार्डाच्या प्रतींचे गहाळ होणे किंवा आधार लिंक करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी पाहता रेशनकार्ड आधारसोबत लिंक होण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे रेशन धारकांचे रेशनकार्ड आधार लिंक होईपर्यत ग्राहकांना प्रचलीत पध्दतीनुसार धान्य वाटप करण्याची मागणी दक्षता समिती सदस्यांनी केली. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देपुरवठा विभागाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - रेशन दुकानदारांकडून आधारकार्डाच्या प्रतींचे गहाळ होणे किंवा आधार लिंक करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी पाहता रेशनकार्ड आधारसोबत लिंक होण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे रेशन धारकांचे रेशनकार्ड आधार लिंक होईपर्यत ग्राहकांना प्रचलीत पध्दतीनुसार धान्य वाटप करण्याची मागणी दक्षता समिती सदस्यांनी केली. यासंदर्भात   जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.    निवेदनाचा आशय असा की, वाशीम शहर व ग्रामीण तसेच जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार ३१ मार्च २०१८ पर्यत शिधापत्रिका धारकांचे आधार क्रमांक लिंक करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पुरवठा विभागामार्फत यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. परंतु अनेक शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानदारांना आधार क्रमांकाची झेरॉक्स प्रत वारंवार दिली असतांना दुकानदारांकडून या प्रती गहाळ केल्या जात असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरत आहे. तसेच आधार लिंक करण्याच्या मशीनमध्ये वारंवार बिघाड व अडचणी येत असल्यामुळे रेशन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये रेशन देण्यावरुन वादावादी होत आहेत. त्यामुळे शासनाने विहीत मुदतीत आधार लिंक करण्याच्या तारखेपर्यत शिधापत्रिका धारकांना प्रचलीत पध्दतीनुसार रेशनचे धान्य देण्यात यावे. जेणेकरुन रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये वादावादी होणार नाही. याबाबीची आपण दखल घेवून यासंदर्भातील आदेश रेशन दुकानदारांना द्यावेत अशी मागणी दक्षता समिती सदस्यांनी दिलेल्या निवेदनातुन केली. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देतांना वाशीम शहर दक्षता समिती सदस्य तथा भाजपा शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, दक्षता समिती सदस्य संजय इरतकर, सतिश बकाले, सुनिल तापडीया, संतोष तोंडे यांच्यासह भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, तालुका अध्यक्ष बंडु पाटील महाले, शहर उपाध्यक्ष निलेश जैस्वाल, शहर उपाध्यक्ष कपिल सारडा, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पवन जोगदंड यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम