मूलभूत सुविधा उपलब्ध करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:16+5:302021-02-05T09:27:16+5:30
...................... मार्जिन मनीसाठी प्रस्ताव पाठवा अनसिंग : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील ...

मूलभूत सुविधा उपलब्ध करा!
......................
मार्जिन मनीसाठी प्रस्ताव पाठवा
अनसिंग : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांकारिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
.’..........................
शासनाच्या निर्देशानुसार पल्स पोलिओ
ताेंडगाव : शासनाच्या निर्देशानुसार परिसरात ३१ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत या भागांत आरोग्य विभागाच्या पथकाने ० ते ५ वर्षे वयोगटातील हजारो बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजले. यावेळी काेराेना नियमांचे पालन करण्यात आले.
.........................
विद्यार्थ्यांचे अर्ज मागविले !
वाशिम : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिली आणि दुसरीतील सन २०२१-२०२२ या सत्रात मोफत प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांकडून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज मागविले आहेत.
.......................
अल्पावधीतच रस्त्याला तडा
शिरपूर जैन : नव्यानेच उभारण्यात आलेल्या शिरपूरमार्गे मालेगाव ते हिंगोली या ४६१ बी राष्ट्रीय महामार्गाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. दरम्यान, मालेगाव ते रिसोड रस्त्याला काही ठिकाणी अल्पावधीतच तडे गेल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
.......................
लोकसहभागातून शेततळे निर्मिती
शेलुबाजार : पारवा या गावात लोकसहभागातून शेततळ्याची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने संपूर्ण तयारी करण्यात आली असून गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या कामी स्थानिक व तालुका प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे.
...................
अंगणवाडी केंद्राची दुरुस्ती
महागाव : येथील अंगणवाडी केंद्राची अवस्था गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वाईट झाली होती. आता १४ व्या वित्त आयोगांतर्गत या अंगणवाडीच्या इमारतीची दुरुस्ती आणि कुंपण भिंतीचे काम करण्यात आले आहे.
.................
शाळा इमारतीच्या भिंतीला तडे!
भर जहाँगीर : येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता त्याच्या भितींना तडे गेले आहेत.