जि.प.शाळेत ठिय्या आंदोलन

By Admin | Updated: August 23, 2014 23:17 IST2014-08-23T22:29:32+5:302014-08-23T23:17:30+5:30

शिक्षक संख्या वाढविण्याची मागणी

The protest movement in the District | जि.प.शाळेत ठिय्या आंदोलन

जि.प.शाळेत ठिय्या आंदोलन

मंगरूळपीर : येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात मागील अनेक वर्षापासून चार शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांचे पद भरण्यात यावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी २२ ऑगस्ट रोजी शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले.
येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीपासून गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र चार विषयाचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. या शाळेत शिकत असलेले बहुतांश पाल्याचे पालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे शिकवणी वर्गाकरिता पैसे भरू शकत नाही तर दुसर्‍या बाजुने महाविद्यालयात शिक्षक नसल्यामुळे शिक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे पालकवर्ग आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंतेत आहेत. ही बाब लक्षात घेवून महाविद्यालयात तत्काळ शिक्षक उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, मुख्याध्यापकांनी एका आठवड्यात अकरावी व बारावीसाठी शिक्षक उपलब्ध करून देऊ असे विद्यार्थ्यांना आश्‍वासन दिले आहे.

Web Title: The protest movement in the District