काळे झेंडे दाखवून शेतक-यांनी केला शासनाचा निषेध
By Admin | Updated: September 2, 2016 01:15 IST2016-09-02T01:15:18+5:302016-09-02T01:15:18+5:30
सुपर कम्युनिकेशन वेसाठी जमिन अधिग्रहणास शेतक-यांचा विरोध.

काळे झेंडे दाखवून शेतक-यांनी केला शासनाचा निषेध
मंगरुळपीर (जि. वाशिम), दि. १ : तालुक्यातील वनोजा येथील शेतकर्यांनी पोळा उत्सवादरम्यान काळे झेंडे दाखऊन व डोक्याला काळ्या फिती बांधून राज्य सरकारचा निषेध केला.
वनोजा शेतशिवारात मुंबई नागपुर सुपर कम्युनिकेशन वे व हब करण्यासाठी शेतकर्यांची जमिन अधिग्रहीत केली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पोळा उत्सवात सहभागी शेतकर्यांनी काळे झेंडे दाखऊन शासनाचा निषेध केला.
सरकारला खरोखरच कृषि समृद्धि आणायची असेल तर येथील शेतकर्यांना अखंड वीज पुरवठा व सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.