राष्ट्रध्वजाचा मान राखून देशाच्या अस्मितेचे रक्षण

By Admin | Updated: January 26, 2015 01:16 IST2015-01-26T01:16:39+5:302015-01-26T01:16:39+5:30

वाशिम जिल्ह्यातील सामाजिक संघटनांचा पुढाकार.

Protecting the country's pride by honoring national flag | राष्ट्रध्वजाचा मान राखून देशाच्या अस्मितेचे रक्षण

राष्ट्रध्वजाचा मान राखून देशाच्या अस्मितेचे रक्षण

वाशिम : संपूर्ण देशात हर्षोल्हासात साजरा होणार्‍या प्रजासत्ताकदिनी देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे चित्र पदोपदी बघायला मिळते. राष्ट्रध्वजाचा अवमान म्हणजेच देशाचा अवमान आहे. हे रोखण्यासाठी जिल्हय़ातील काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. २६ जानेवारी रोजी दिवसभर जिल्हय़ात विविध ठिकाणी या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
२६ जानेवारी २0१५ रोजी नागरिक आपल्या देशाचा ६५ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालय, शाळा- महाविद्यालयांमध्ये झेंडा वंदन केल्या जाते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केल्या जाते. गल्ली-बोळात, चौका-चौकात लहान मुले व नागरिक राष्ट्रध्वज घेऊन फिरतात. ठिकठिकाणी मोठय़ाने देशभक्तीपर गीत वाजविण्यात येतात. सकाळी ७ वाजतापासून तर १२ वाजेपर्यंत देशभक्तीचा ज्वर प्रत्येकाच्या डोक्यावर चढलेला असतो. दुपारनंतर मात्र हा ज्वर कमी होतो व थोड्या वेळेपूर्वी डोक्यावर, वाहनांवर, खिशाला लावण्यात येत असलेले झेंडे व राष्ट्रध्वज कचर्‍यात, रस्त्यावर, नालीत पडलेले दिसतात. दुसर्‍या दिवशी कचरा कुंड्यांमध्ये अनेक राष्ट्रध्वज सापडतात. राष्ट्रध्वजाचा हा अपमान रोखण्यासाठी जिल्हय़ातील काही समाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रीय अपंग विकास महामंडळ, छावा संघटना, मारवाडी युवा मंच, युवा मित्र मंडळ, मारवाडी मिडटावून शाखा, वंदे मातरम ग्रुप मालेगाव, सराफा व सुवर्णकार असोसिएशन मालेगाव, जैन नवयुवक मंडळ मालेगाव आदी संघटना राष्ट्रध्वजाच्या अपमान रोखण्यासाठी सरसावल्या आहेत. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्ते, नाल्या किंवा कचर्‍यात पडलेले राष्ट्रध्वज उचलून योग्य ठिकाणी ठेवतील

Web Title: Protecting the country's pride by honoring national flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.