प्रस्तावित विश्रामभवनाला निधीचा ‘ब्रेकर’

By Admin | Updated: November 23, 2014 00:25 IST2014-11-23T00:25:46+5:302014-11-23T00:25:46+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव शासनदरबारी धुळखात.

Proposed Rehabilitation Fund 'breaker' | प्रस्तावित विश्रामभवनाला निधीचा ‘ब्रेकर’

प्रस्तावित विश्रामभवनाला निधीचा ‘ब्रेकर’

नागेश घोपे / वाशिम
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात ह्यव्हीआयपींह्णच्या सरबराईसाठी प्रस्तावित असलेल्या १२ सुटच्या विश्रामभवनाला निधीने ब्रेक लावले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या या वास्तूचे तयार केलेले अंदाजपत्रक केवळ निधीसाठी रखडलेले आहे.
वाशिम शहरात आजमितीला दोन विश्रामगृह आहेत. यापैकी बसस्थानका लगतच्या विश्रामगृहावर चार साधे सुट तर सिव्हिल लाईन परिसरातील विश्रामभवनात दोन साधे व दोन व्हिआयआपी सुट आहेत. वाशिम जिल्हा होण्यापूर्वीच या विश्रामगृहांचे बांधकाम झालेले आहे. तेव्हाच्या तुलनेत आजघडीला वाशिम शहरात व्हीआयपीं च्या वार्‍या वाढलेल्या आहेत. सन १९९८ ला अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन जन्माला आलेल्या वाशिम जिल्ह्याचे मुख्यालय वाशिम शहरात थाटण्यात आल्यामुळे स्वाभाविकच येथे येणार्‍या केद्रीय व राज्यांचे मंत्री, सचिव दर्जाचे अधिकारी, उच्च न्यायालयांचे न्यायाधिश, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक व साहित्यीक क्षेत्रातील मान्यवर त था अन्य व्हीआयपींच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरात उपलब्ध असलेले दोन्ही विश्रामगृह या व्हिआयपींच्या सरबराई व मुक्कामासाठी तोकडे पडत असल्यामुळेच जिल्हा प्रशासनाने गत वर्षभरापूर्वी शासनाकडे नविन विश्रामभवनाचा प्रस्ताव ठेवला हो ता जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार गावित व जिल्हा नियोजन समितीने त्यांला मंजुरात दिली होती. सदर कामासाठी शासनाकडुन विशेष बाब म्हणून निधी आणण्याचे त्यावेळी ठरले होते. परंतु त्यांनतरच्या काही महिन्यात गावित यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी झाली. त्यामुळे स्वाभाविकच हा प्रस्ताव रखडला. आता राज्यात सत्तापालट झाला आहे. सत्तारूढ पक्षाचे दोन आमदार जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरातील प्रस्तावित विश्रामभवनासाठी निधीची तर तूद व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नरत असल्याचे स्पष्ट केले. सद्या शहरात असलेले विश्रामगृह अपुरे पडत आहेत. त्यामुळे व्हीआय पींची सरबराई करतांना प्रशासनाला अडचणींना सामोरा जावे लाग त असल्याचे देखील अधोरेखीत केले.

* असे आहे प्रस्तावित विश्रामभवन
सिव्हिल लाईन परिसरातील विश्रामभवनालगत तथा जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय निवासस्थानासमोरील शासकीय खुल्या जागेत नविन विश्राम भवन प्रस्तावित करण्यात आले आहे. तब्बल पाच कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेले सदर विश्रामभवन दोन मजली राहणार असुन तळ मजल्यावर सहा तर वरच्या मजल्यावर सहा सुट उभारण्यात येणार आहेत. यापैकी चार सुट व्हिआयपींसाठी आरक्षित राहणार असुन उर्वरित आठ सुट साधे ठेवण्यात येणार आहेत.
वाशिम जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी ८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली औषध निर्माण अधिकार्‍यांची परिक्षा रद्द करण्यात आली असुन ती परिक्षा पुन्हा ३0 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Proposed Rehabilitation Fund 'breaker'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.