दुर्धर आजारग्रस्तांचे प्रस्ताव; शनिवारी होणार बैठक
By Admin | Updated: August 31, 2016 02:18 IST2016-08-31T02:18:11+5:302016-08-31T02:18:11+5:30
वाशिम जिल्हा परिषदेला दुर्धर आजारग्रस्तांचे ५७ प्रस्ताव; लोकमत वृत्ताची दखल

दुर्धर आजारग्रस्तांचे प्रस्ताव; शनिवारी होणार बैठक
वाशिम, दि. ३0: जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार्या १५ हजार रुपयांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील ५७ दुर्धर आजारग्रस्त लाभार्थींचे प्रस्ताव बैठकीअभावी रखडल्याचे वृत्त 'लोकमत'ने २५ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी बैठक लावण्याचे निर्देश दिल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी बैठक होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून औषधोपचारासाठी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय़रेषेखालील कर्करोग, हृदयरोग व किडनीग्रस्त अशा ५७ रुग्णांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर केले. दर तीन महिन्यांनी होणार्या सभेत या प्रस्तावांना मंजुरात मिळणे अपेक्षीत आहे. एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यात जिल्हाभरातून ५७ प्रस्ताव आरोग्य विभागाला प्राप्त झाले. मात्र, जूनच्या अखेरीस जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आणि त्यानंतर ८ जुलै रोजी विषय समिती सभापतींची निवडणूक झाली. विषय समिती सभापतींच्या निवडणुकीनंतर खाते वाटप झाल्याने, जुलै महिन्यात होणारी आरोग्य समितीची बैठक लांबणीवर पडली. परिणामी, दुर्धर आजारग्रस्तांचे प्रस्ताव ह्यजैसे थेह्णच आहेत. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने २५ ऑगस्टच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना बैठक लावण्याचे निर्देश दिले. बैठकीची तारीख निश्चित करून त्यामध्ये सर्व पात्र व अपात्र प्रस्ताव ठेवण्याच्या सूचनाही देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी बैठक होणार असल्याचे डॉ. सेलोकर यांनी सांगितले.