गावठाण क्षेत्रातील जागेचे मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:39 IST2021-02-12T04:39:31+5:302021-02-12T04:39:31+5:30

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, जिल्हा अधीक्षक भूमी ...

‘Property Card’ for land in Gaothan area | गावठाण क्षेत्रातील जागेचे मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’

गावठाण क्षेत्रातील जागेचे मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विकास बंडगर यांची प्रमख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले, गावठाणातील मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी शासनाने महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सर्व गावांमधील नमुना ८ अ अद्ययावत करणे, तसेच गावठाणाच्या सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. नमुना ८ अ अद्ययावत करण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांची असणार आहे, तर गावठाणाच्या सीमा निश्चित करण्याची कार्यवाही संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची राहील.

सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असून याकरिता तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने गावठाण सीमा निश्चिती व नमुना ८ अ अद्ययावत करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करून त्याचा कृती आराखडा तयार करून १७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी सांगितले.

Web Title: ‘Property Card’ for land in Gaothan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.