उंबर्डा येथे अधिकाऱ्यांची तातडीने भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:20+5:302021-03-18T04:41:20+5:30

येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. आर. नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी केंद्र, जिल्हा परिषद विद्यालय तथा अंगणवाडी ...

Prompt visit of officials at Umbarda | उंबर्डा येथे अधिकाऱ्यांची तातडीने भेट

उंबर्डा येथे अधिकाऱ्यांची तातडीने भेट

येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. आर. नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी केंद्र, जिल्हा परिषद विद्यालय तथा अंगणवाडी केंद्र क्र.३ व ४ मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने युध्दपातळीवर कोरोना चाचणी मोहीम राबविण्यात येत आहे. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहेत. १४ मार्चच्या अहवालात प्रभाग क्र. ३ मधील १२ , प्रभाग क्र. ५ मधील १ अशा एकूण १३ तर १५ मार्च रोजी १० व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने दोन दिवसांतच कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा २३ वर पोहोचल्याने गावात खळबळ उडाली आहे. गावात गर्दीच्या ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. यावेळी तहसीलदार धिरज मांजरे यांनी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. आर.नांदे यांच्याकडून कोरोना चाचणी तथा लसीकरणाबाबत माहिती घेऊन गावात लसीकरणासह कोरोना चाचणी मोहीम युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी कारंजाचे गटविकास अधिकारी कालिदास तापी, सरपंच राज चौधरी, पोलीस पाटील उमेश देशमुख, डाॅ.आडे , पटवारी, मुंडाळे, ग्रामविकास अधिकारी जयकिसन आडे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Prompt visit of officials at Umbarda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.