इन्स्पायर अवार्डमधील प्रोजेक्ट अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:23+5:302021-09-25T04:45:23+5:30
००००००००००००० मालवाहू वाहनाला महामार्गावर अपघात वाशिम : वाशिम-मंगरुळपीर मार्गावर कळंबा महालीपासून काही अंतरावर मंगळवारी रात्री मंगरुळपीर येथून वाशिमकडे जाणारे ...

इन्स्पायर अवार्डमधील प्रोजेक्ट अप्राप्त
०००००००००००००
मालवाहू वाहनाला महामार्गावर अपघात
वाशिम : वाशिम-मंगरुळपीर मार्गावर कळंबा महालीपासून काही अंतरावर मंगळवारी रात्री मंगरुळपीर येथून वाशिमकडे जाणारे मालवाहू वाहन रानडुक्कर आडवे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उलटले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही.
-----------
पथदिव्यांअभावी ग्रामस्थांना अडचणी
वाशिम : पावसाळा संपत आला तरी ग्रामीण भागांतील अनेक गावांत बंद असलेले पथदिवे सुरू करण्याबाबत ग्रामपंचायती उदासीन असून, पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
------------------
रोही करताहेत पिके फस्त
वाशिम : खरीप हंगामातील पिके आधीच पावसामुळे संकटात आहेत. त्यात वन्यप्राणी या पिकांवर ताव मारत आहेत. यात रोहिंचे कळप शेकडो एकर क्षेत्रातील शिवारात धुडगूस घालून सोयाबीन, उडिदाची पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.