महेश नवमीनिमित्त मिरवणूक

By Admin | Updated: June 7, 2014 22:54 IST2014-06-07T22:31:20+5:302014-06-07T22:54:02+5:30

महेश नवमी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त राजस्थानी समाजातर्फे मिरवणूक काढण्यात आली.

The procession on Mahesh Navami | महेश नवमीनिमित्त मिरवणूक

महेश नवमीनिमित्त मिरवणूक

मंगरूळपीर : शहरात ७ जून रोजी महेश नवमी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त राजस्थानी समाजातर्फे मिरवणूक काढण्यात आली.
येथील चारभूजानाथ मंदिरात मिरवणूक आल्यानंतर विदर्भ प्रादेशिक माहेश्‍वरी सभेचे जिल्हाध्यक्ष शंकरलाल लोहिया, समाजाचे ज्येष्ठ नागरिक बंसीलाल असावा यांच्या हस्ते भगवान महेश यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी रमेश नावंधर, दीपक लोहिया, गोविंद मुंदडा, मुन्ना लोहिया, अनिल बंग उपस्थित होते. या प्रसंगी डॉ.निखील बजाज, संजय राठी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महेश नवमी या विषयावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व संचालन नंदलाल जाखोटिया यांनी केले. कार्यक्रमाला हरिष बियाणी, सोनू जाखोटिया, पवन सारडा, गणेश राठी, अभिजीत भूतडा, सोनू सर्वा, निरज बजाज, गणेश बजाज, जितू बजाज, पवन बियाणी, प्रकाश जाखोटिया, संदीप बंग, रवि बंग, लाला शर्मा, उज्वल बंग, राजू बजाज यांच्यासह राजस्थानी भजनी मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The procession on Mahesh Navami