शेतातच होतेय हळकुंडावर प्रक्रिया
By Admin | Updated: March 14, 2017 14:09 IST2017-03-14T14:09:21+5:302017-03-14T14:09:21+5:30
मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात हळद लागवडीवर शेतक-यांचा भर असून, या पिकाच्या माध्यमातून शेतकरी लाखोंचे उत्पादन घेतात.

शेतातच होतेय हळकुंडावर प्रक्रिया
ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन (वाशिम), दि. 14 - मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात हळद लागवडीवर शेतक-यांचा भर असून, या पिकाच्या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पादन घेतात.
शेतातील हळद काढणीनंतर सुकवून तेथेच बॉयलिंग करण्यात येते. पूर्वी हळद उत्पादन घेतल्यानंतर त्याची घासणी करण्याकरिता बाहेरगावी जावे लागत होते. मात्र आता गावातच व्यवस्था झाल्याने शेतक-यांना हळकुंडावर प्रक्रिया करणं सोयीचं झालं आहे. .
शिरपूर परिसरात नामदेव देशमुख, दिलीप देशमुख आणि प्रकाश शिरपूर, गजानन डवळे, निलेश शर्मा, मुख्ता खार पठाण, ज्ञानेश्वर गावंडे, नंदकिशोर उल्हामाले यासह अनेक शेतकरी शेतातच हळकुंडावर प्रक्रिया करतात.