जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट
By Admin | Updated: July 7, 2014 23:39 IST2014-07-07T23:39:38+5:302014-07-07T23:39:38+5:30
शेतकर्यांजवळ असलेला चारा संपल्यामुळे जनावरांचे हाल होत आहे.

जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट
मानोरा: जून महिना संपला परंतु अद्यापही तालुक्यात पावसाला सुरूवात नाही. त्यामुळे शेतकर्यांजवळ असलेला चारा संपल्यामुळे जनावरांचे हाल होत आहे. आता चार्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मानोरा तालुक्यात डोंगराळ विभाग असल्याने रूई गोस्ता, रतनवाडी, पाळोदी, अमदरी या इतर भागात काही प्रमाणात रब्बी मोसमात पडलेल्या पावसामुळे तेथे चार्याची काळजी मिटली होती. मानोरा तालुक्यात पशूधन फार मोठय़ा प्रमाणावर आहे. जवळपास ७0 टक्के शेतकर्यांजवळ गाई, म्हशी, शेळ्या, बैल मोठय़ा प्रमाणवर आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांजवळील चारा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच संपत असतो.त्यानंतर दोन महिने पुरेल एवढा चारा शेतकरी साठवून ठेवतात.त्यामुळय़ एप्रिलच्या शेवटपर्यंत हा चारा पुरतो. परंतु यावर्षी मार्च-एप्रिल मधील काळात मोठय़ा प्रमाणावर झालेल्या अवकाळी पावासमुळे शेतात उभी असलेली पर्हाटी हिरवी झाली. सर्वत्र हिरवे गवत उगवून जनावरांना नवा चारा उपलब्ध झाला होता.
त्यानंतर मे -जून पर्यंत शेतकर्यांनी साठवून ठेवलेला चारा जनावरांना खाऊ घातला. आता मात्र चारा संपला आहे. सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच थोडासा पाऊस झाल्यानंतर काही शेतकर्यांनी पेरणी केलल्या बियाण्यातून उगवलेले अंकुर कोमेजले आहे.
अद्यापही उन्हाळासदृष्य स्थिती असल्यामुळे जंगलात चारा नाही.गेल्या १0-१२ दिवसापासून जनावरे अर्धपोटी राहत आहे. यामुळे पशूधनाची अवस्था गंभीर झाली आहे. म्हणून शासनाने त्वरित चारा डेपोच्या माध्यमाने चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पशूपालकाकडून होत आहे.
या अतिशय गंभीर व जिव्हाळ्याच्या मागणीकडे शासकीय अधिकारी तसेच खासदार-लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तालुक्यात चारा डेपो उघडून शेतकर्यांना गुरांसाठी े चारा उपलब्ध करून द्यावा अन्यथा तालुक्यातील गोधन संपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.