खासगी बसला अपघात; १८ प्रवासी जखमी
By Admin | Updated: March 11, 2017 02:33 IST2017-03-11T02:33:01+5:302017-03-11T02:33:01+5:30
मालेगाववरून रिसोडकडे जाणार्या खासगी बसला अपघात; गंभीर जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.

खासगी बसला अपघात; १८ प्रवासी जखमी
शिरपूर जैन (वाशिम), दि. १0- मालेगाववरून रिसोडकडे जाणार्या खासगी बसला अपघात होऊन १७ ते १८ प्रवासी जखमी झाल्याची घटना वसारी गावाजवळ शुक्रवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास घडली. स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. जखमींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. एचएच ३७- ६८४४ ही खासगी बस १0 मार्च रोजी सकाळी ९ वाजता मालेगाववरुन रिसोडकडे प्रवासी घेऊन जात होती. वसारी गावाजवळ स्टेरींग रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्त्यालगचे झाड तोडून बस उलटी होऊन परत सरळ झाली. या अपघातात एकूण १७ ते १८ जण जखमी झाले. यापैकी गंभीर जखमींना वाशिम व अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. जखमींना प्रथमोपचारासाठी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता, वैद्यकीय अधिकारी ङ्म्रीकांत करवते हे आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याचे दिसून आले. परिचारीका अर्चना माळेकर महानंदा बोपटे, एम.आर.जाटे, गाडे, कर्मचारी मुन्ना लांडगे, अमर झळके आदी आरोग्य कर्मचार्यांनी तातडीने उपचार सुरू केले. पाच रुग्णवाहिकेने जखमींना उपचारासाठी वाशिमला पाठविले. जखमींमध्ये अरुण नवृत्ती मुराडकर रा. पेडगाव, गोपाल वामन पंडितकर रा.शेगाव खोडके, पुष्पा वामन पंडितकर रा.शेगाव खोडके, बबन पुरी व दादाराव सरवाणी रा. बोरगाव, शत्रुघ्न किसन शिंदे, लक्ष्मी संतोष गवई, संतोष गवई, अश्विनी गावंडे, शहीस्ता परवी, महेमद मुज्जंबीर गुलाम नबी, उमेश उद्धव जाधव रा. वसारी यांच्यासह पाच ते सहा जणांचा समावेश आहे.