प्राथमिक आरोग्य केन्द्राची दुरवस्था

By Admin | Updated: July 8, 2014 22:52 IST2014-07-08T22:52:13+5:302014-07-08T22:52:13+5:30

कारंजा तालुक्यातील मनभा येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात विविध समस्या आहे.

Primary health center deterioration | प्राथमिक आरोग्य केन्द्राची दुरवस्था

प्राथमिक आरोग्य केन्द्राची दुरवस्था

कारंजा : तालुक्यातील मनभा येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात विविध समस्या आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असा उपदेश प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी गावकर्‍यांना देतात. मात्र ७ जुलै रोजी प्रत्यक्ष निरीक्षण केले असता या प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. आरोग्य केंद्राच्या परिसरातील पथदिवे नादुरूस्त आहेत. त्यामुळे परिसरात रात्रीला अंधाराचे साम्राज्य दिसून येते. टाकावू वस्तूंचा परिसरात खच पडला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध समस्या संबंधितांनी दूर कराव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे.

Web Title: Primary health center deterioration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.