देपूळ येथे श्रीदत्त व अनसूया माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:55+5:302021-08-23T04:43:55+5:30

देपूळ येथील श्रीदत्तगुरू मंदिरात श्रीदत्त व अनसूया माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला विमलानंद महाराज (शेंडी महाराज), आचार्य ...

Prestige of Shridatta and Ansuya Mata idols at Depul | देपूळ येथे श्रीदत्त व अनसूया माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

देपूळ येथे श्रीदत्त व अनसूया माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

देपूळ येथील श्रीदत्तगुरू मंदिरात श्रीदत्त व अनसूया माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला विमलानंद महाराज (शेंडी महाराज), आचार्य शिवदास शास्त्री, वृंदावन यांच्यासह माजी जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार लखन मालिक, पवनकुमार वर्मा, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी, मध्यवर्ती बँक संचालक राजूभाऊ चौधरी, मोहन चौधरी, शामभाऊ देने, समाधान माने, डिगांबर खोरणे, संजय मापारी, मोतीराम पाटील, शिक्षक आघाडीचे अमरावती विभागीय सदस्य माणिकराव गंगावणे यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. यानिमित्त देपुुळातील ४०० लेकीबाळींचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे देपुळात दिवाळीच साजरी झाल्याचे वाटत होते. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. देपुळात दत्तमंदिर व्हावे अशी इच्छा गुरुवर्य श्री माधव गिरी बाबा यांनी व्यक्त केल्यामुळे त्यांच्या शेकडो शिष्यांनी लोकसहभागातून देपुळात दत्तमंदिर उभारण्याचा संकल्प गतवर्षी व्यक्त केला होता, तेव्हाच युद्धपातळीवर मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले होते, आता या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे.

Web Title: Prestige of Shridatta and Ansuya Mata idols at Depul