अतिरेक्यांचा खात्मा करणाऱ्या वाशिमच्या जवानास राष्ट्रपती वीरता पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:11+5:302021-07-30T04:43:11+5:30

राष्ट्रपती वीरता पदक मिळविणारे निशांत काकडे हे जिल्ह्यात पहिलेच तर विदर्भातील दुसरे जवान आहेत. सन २०१८ काश्मीरच्या बारामुल्लाजवळील एका ...

President's Medal of Bravery to Washim's jawans for eliminating terrorists | अतिरेक्यांचा खात्मा करणाऱ्या वाशिमच्या जवानास राष्ट्रपती वीरता पदक

अतिरेक्यांचा खात्मा करणाऱ्या वाशिमच्या जवानास राष्ट्रपती वीरता पदक

राष्ट्रपती वीरता पदक मिळविणारे निशांत काकडे हे जिल्ह्यात पहिलेच तर विदर्भातील दुसरे जवान आहेत.

सन २०१८ काश्मीरच्या बारामुल्लाजवळील एका गावात रात्री ७ अतिरेकी एका घरात लपून बसल्याची सूचना सीआरपीएफ जवानांना मिळाल्याने सुरक्षादल तत्काळ त्यांच्या शोधार्थ सैन्यदल आणि सीआरपीएफचे एक संयुक्त ऑपरेशन सुरू होते. हे ७ अतिरेकी मागच्या पळून जाऊ नये म्हणून थोड्या अंतरावर सीआरपीएफचे चार जवान तैनात होते. या जवानात वाशिमचे निशांत काकडे यांचाही समावेश होता. जवानांना एकीकडे ७ लपलेल्या अतिरेक्यांना शोधायचे होते तर दुसरीकडे सामान्य नागरिकांची सुरक्षितता सांभाळायची होती. हे करतानाच अतिरेक्यांच्या समर्थनार्थ दगडफेक करणाऱ्या स्थानिकांच्या जमावाला प्रत्यक्ष शोध कार्यापासून दूर ठेवायचे होते. त्यावेळी अतिरेक्यांनी अचानक सैनिकावर गोळीबार सुरू केला. यात एक जवानास वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे इतर सैनिकांना सुरक्षित आडोसा घ्यावा लागला. त्यानंतर सीआरपीएफचे चारही जवान अतिरेकी लपून बसलेल्या घराकडे निघाले. तेवढ्यात एका अतिरेक्याने त्यांच्यावर गोळ्यांची फैर झाडली. त्याच्या गोळीबारात सीआरपीएफचे जवान मारल्या गेले, असे वाटल्याने त्याने खिडकीतून बाहेर अंधारात उडी मारली. जवानांनी आवाजाच्या दिशेने अचूक गोळ्या झाडल्या. यात लष्कर ए तोयबाचा तो अतिरेकी मारल्या गेला. दिवस उजाडल्यावर त्या घरात लपून बसलेल्या दुसऱ्या अतिरेक्यालाही देखील आपल्या जवानांनी अचूक टिपले. या कर्तव्य तत्परतेबद्दल भारताच्या राष्ट्रपतींकडून सीआरपीएफच्या जवानांना पोलीस मेडल फॉर गॅलेंट्री जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या नियमांमुळे त्या ऑपरेशनमध्ये कर्तव्यावर असलेले सीआरपीएफचे स्थानिक जवान निशांत काकडे यांना ते पोलीस वीरता पदक २३ जुलै रोजी कोलकाता येथे प्रदान करण्यात आले.

-----------

७ वर्षांत विविध मोहिमांत सहभाग

वाशिम येथील निशांत काकडे यांची सीआरपीएफ तर्फे ७ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये पोस्टिंग झाली. या ७ वर्षात त्यांनी अतिरेक्यांशी लढतांना विविध मोहिमांमध्ये सहभाग घेतला. २०१८ मध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शौर्य दाखविल्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींकडून पोलीस मेडल फॉर गॅलेंट्री हा सन्मान जनक पुरस्कार मिळाला आहे. याप्रसंगी त्यांचे जेष्ठ बंधू प्रसिध्द ह.भ.प. नामदेव महाराज काकडे यांची उपस्थिती होती.

Web Title: President's Medal of Bravery to Washim's jawans for eliminating terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.