शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधा-यांकडेच सभापतिपद!

By admin | Updated: February 16, 2016 02:05 IST

मालेगावात भाजपा तर मानो-यात राकाँ व काँग्रेस सत्तेत सहभागी झाले आहेत.

वाशिम: मालेगाव व मानोरा नगर पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर १४ फेब्रुवारीला विषय समिती सभापतींची निवडणूक झाली. सभापती पदाच्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांना यश मिळाले असले तरी काही ठिकाणी आघाडीबाहेरच्या पक्षाला सभापतिपद सोडावे लागले. मालेगाव येथे भाजपा आणि मानोरा येथे राकाँ व काँग्रेस सत्तेत सहभागी झाले आहेत. मालेगाव: मालेगाव नगर पंचायतीत राष्ट्रवादी व काँग्रेस व शिवसंग्रामचे प्रत्येकी चार, भाजपाचे एक व अपक्ष एक असे मिळून १७ सदस्य निवडून आले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. राकाँच्या मीनाक्षी परमेश्‍वर सावंत या अध्यक्ष तर काँग्रेसचे गोपाल मानधने हे उपाध्यक्ष झाले. रविवारी विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर, सभापती पदाच्या निवडणुकीत सूचक व अनुमोदक कोण? यावरून बरीच चर्चा झाली. सभापती पदासाठी काँग्रेसकडून अफसाना बी सय्यद तस्लीम व रेहान चौधरी, भाजपाकडून किशोर महाकाळ व अपक्ष सदस्य शहानूर बी सत्तार शाह यांचा अर्ज आला. राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद आणि नामनिर्देशित सदस्य पद दिल्याने दोन पदे काँग्रेस, एक भाजपा व एक अपक्ष अशी बोलणी झाल्याचे वृत्त आहे. यानुसार सभापतिपदी काँग्रेस दोन, भाजपा एक व अपक्ष एक अशा चार सदस्यांची वर्णी लागली. महिला व बालकल्याण सभापतिपदी काँग्रेसच्या अफसाना बी सय्यद तस्लीम, पाणीपुरवठा सभापतिपदी रेहान चौधरी तर भाजपाचे किशोर महाकाळ यांच्याकडे आरोग्य आणि अपक्ष असलेले शहानूर बी सत्तार शाह यांच्याकडे बांधकाम सभापतिपद आले. मानोरा: मानोरा नगर पंचायतीच्या सभापतींची निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी कारंजा उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या उपस्थितीत पार पडली. सर्व सभापतींची निवडणूक अविरोध झाली असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाली आहे. अध्यक्षपदी रेखा शामराव पाचडे, उपाध्यक्ष तथा महिला व बालविकास समितीच्या सभापतिपदी निखतजबीन रशिदखान पठाण, तर आरोग्य सभापतिपदी शेख वहीद शेख अय्युब, सार्वजनिक बांधकाम सभापतिपदी सुनेहरा परविन विहिदोद्दिन शेख, तर पाणीपुरवठा व मलनिसारण सभापतिपदी गणेश परशराम भोरकडे यांची निवड करण्यात आली.