माझी वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्य सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST2021-01-21T04:36:19+5:302021-01-21T04:36:19+5:30

कार्यक्रमाला नायब तहसीलदार राठोड,नगराध्यक्ष बरखा अल्ताफ बेग, नगरसेवक निशार शहा, अभियंता राजेंद्र अंभोरे, अक्षय सोनोने उपस्थित होते. अखिल भारतीय ...

Presented a street play under my Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्य सादर

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्य सादर

कार्यक्रमाला नायब तहसीलदार राठोड,नगराध्यक्ष बरखा अल्ताफ बेग, नगरसेवक निशार शहा, अभियंता राजेंद्र अंभोरे, अक्षय सोनोने उपस्थित होते.

अखिल भारतीय नाट्यपरिषद, नटश्री बहुद्देशीय संस्था, स्त्री शक्ती बहुद्देशीय संस्था मानोरा तर्फे या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले हाेत. स्वछता, पाणी, जंगल, वृक्षारोपण, सौरऊर्जा, जैवविविधता ,व्यसनमुक्ती आदी विषयांवर जाणीव जागृती करण्यात आली. यशवंत पद्मगिरवार, आनंदा खुळे, जगदीश सवंदळे, राजाराम नोळे, प्रवीण सोनोने, सुभाष वाघमारे,नारायण खाडे, किरण पद्मगिरवार, अंकुश डवले, मोतीराम शेळके,ताई इसलकर यांनी पथनाट्यमध्ये सहभाग घेतला.

---------

स्पर्धांना प्रतिसाद

माझी वसुंधरा व स्वछ सर्वेक्षण-२०२१ अभियान मानोरा येथे नगरपंचायतच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांना प्रतिसाद मिळाला. यावेळी न. पं. मानोरा अध्यक्ष बरखा अल्ताफ बेग, उपाध्यक्ष अमोल राऊत, सर्व सदस्य गण आणि मुख्याधिकारी नीलेश गायकवाड,अभियंता राजेंद्र अंभोरे, जगदीश नागलोथ आदी उपस्थित हाेते.

Web Title: Presented a street play under my Vasundhara Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.