नेत्यांच्या सभांमधील उपस्थितीचेही होतेय ‘राजकारण’

By Admin | Updated: October 7, 2014 01:30 IST2014-10-07T01:30:59+5:302014-10-07T01:30:59+5:30

वाशिम जिल्ह्यात एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने निवडणुकीचे मैदान गाजतेय.

The presence of leaders at the meetings of the 'politics' | नेत्यांच्या सभांमधील उपस्थितीचेही होतेय ‘राजकारण’

नेत्यांच्या सभांमधील उपस्थितीचेही होतेय ‘राजकारण’

वाशिम : उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांनी घेतलेल्या सभांमधील मतदारांच्या उपस्थितीचेही प्र ितस्पध्र्यांकडून राजकारण केले जात असल्याने निवडणुकीच्या आखाड्यात रंगत येत आहे. वाशिम जिल्ह्यात पार पडलेल्या तीन पक्षांच्या नेत्यांच्या सभांमधील मतदारांच्या हजेरीच्या मुद्याचे विरोधकांकडून राजकारण केले जात आहे.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत युती व आघाडीची ताटातूट झाल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप-बमसं, बसपा, अपक्ष व बंडखोर उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. विधानसभेच्या रणधुमाळीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह बंडखोर, अपक्ष उमेदवारही शड्ड ठोकून उतरले आहेत. आपण ठोकलेल्या शड्डचा आवाज आपल्या मतदारसंघात घुमला पाहिजे यासाठी पदयात्रा, प्रचारफेर्‍या, घरोघरी म तदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींद्वारे प्रचारही सुरू आहे. यासोबतच पक्षाची ध्येय-धोरणे मतदारांपर्यंत पोहोचविणे, मतदारांना आपल्या उमेदवाराच्या बाजूने अनुकूल करणे, प्रतिस्पर्धी पक्ष व उमेदवाराच्या कमकुवत बाजू तसेच त्यांच्या कारनाम्यांचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवण्यासाठी प्रत्येकाकडून प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणुकीतील उमेदवारांच्या लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर विविध पक्षांचे स्टार प्रचारक प्रचाराचा धुरळा उडवून राजकीय मैदान दणाणून सोडतील, असा अंदाज वर्तविला जात होता; परंतु तसे झाले नाही. आतापर्यंंत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंच्या नेत्यांच्याच सभा झाल्याने काँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा नेत्यांच्या सभेची जिल्हावासीयांना प्रतीक्षाच आहे.
प्रत्येक पक्षाकडून मतदारांच्या साक्षीने भरगच्च सभा घेण्याचा दावा केला जात होता. सर्वप्रथम भाज पाने वाशिम शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा घेतली. या सभेतील मतदारांच्या उपस्थि तीवरून नवीन राजकारण सुरू झाले आहे. सभा यशस्वी झाल्याचा दावा भाजपाने केला, तर दुसरीकडे या सभेकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे सांगून आमच्याच उमेदवाराची बाजू भक्कम आहे, असा प्रचार विरोधकांनी चालविला आहे. या सभेतील मतदारांच्या उपस्थितीचे विरोधक राजकारण करीत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: The presence of leaders at the meetings of the 'politics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.