मतदानासाठी यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: October 15, 2014 01:05 IST2014-10-15T01:05:59+5:302014-10-15T01:05:59+5:30

पोलीसांना सहकार्य करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन.

Prepare the system for voting | मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मतदानासाठी यंत्रणा सज्ज

वाशिम : विधानसभा निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस यंत्नणा पुर्णपणे सज्ज असून जिल्हयातील पोलीस बंदोबस्तासोबत बाहेरुनही अतिरिक्त पोलीस फोर्स मागविण्यात आला आहे. अशी माहिती जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी दिली. आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या दिवशी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होवू नये याची पुरेपुर खबरदारी घेण्यात येत आहे. विधानसभेच्या सार्वत्निक निवडणूकीकरीता जिल्हयातील पोलिस दलासोबत बाहेरुनही अ ितरिक्त फोर्स मागविण्यात आल आहे. सद्यस्थितीत एक हजार ३00 पोलिस कर्मचारी, ६२ सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, १७ पोलिस निरीक्षक, सहा उ पविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस उपअधीक्षक, एक अपर पोलिस अधीक्षक तथा एक पोलिस अधीक्षक आदी अधिकार्‍यांवर बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय अर्धसैनिक बलाच्या पाच तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेतयामध्ये एसआरपीएफची एक तुकडी, आयआरबीच्या दोन तुकड्या, आरपीएसएफच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे. गृहरक्षक दलाच्या ३२१ जवानांवर निवडणूकीतील बंदोबस्ताची धुरा सोपविण्यात आली आहे. तंटामुक्त समित्यांचेही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी मदत घेतली जाणार असल्याचेही पोकळे यांनी यावेळी सांगितले.

 १0 मतदान केंद्र अतिसंवेदनशिल

    जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण ५0 मतदान केंद्र संवेदनशील आहेत या पैकी १0 मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. त्यात रिसोड मतदार संघातील ५, वाशिम म तदारसंघामधील तीन व कारंजा मतदारसंघामधील दोन मतदान केंद्रांचा समावेश आहे.

  ४९४९ मतदान कर्मचारी नियुक्त

      जिल्ह्यात एकूण ९६५ मतदान केंद्र व १0 सहाय्यक मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यामधील १४३ मतदान केंद्रे हि नागरी भागातील आहेत तर ८३२ मतदान केद्रे ग्रामीण भागा तील आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर एकूण ४९४९ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुमारे ८५ टक्के पेक्षा अधिक मतदारांना मतदार चिट्टीचे वाटप पूर्ण झाले आहे.

Web Title: Prepare the system for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.