धनज परिसरात कांदा लागवडीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST2021-01-08T06:11:22+5:302021-01-08T06:11:22+5:30

^^^^^^ जलवाहिनी नादुरुस्त पोहरादेवी : जीवन प्राधिकरणच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची जलवाहिनी नादुरुस्त असल्याने परिसरातील काही भागात पाण्याचा अपव्यय होत ...

Preparations for onion cultivation in Dhanaj area | धनज परिसरात कांदा लागवडीची तयारी

धनज परिसरात कांदा लागवडीची तयारी

^^^^^^

जलवाहिनी नादुरुस्त

पोहरादेवी : जीवन प्राधिकरणच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची जलवाहिनी नादुरुस्त असल्याने परिसरातील काही भागात पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय ग्रामस्थांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. शिवाय रस्त्यावर पाणी वाहून गटार तयार होत आहेत. त्यामुळे या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

-------

हरणांकडून हरभरा पीक उद्ध्वस्त

कोठारी: परिसरात शिवारात गेल्या आठवडाभरापासून उगवलेल्या रबी पिकांवर हरीण, माकडे, नीलगाईचे कळप ताव मारून नुकसान करीत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. सोमवारी परिसरात हरणांच्या कळपांनी हरभरा पिकाचे अतोनात नुकसान केले. यात एका शेतकऱ्याच्या दोन एकर क्षेत्रातील हरभरा पीक ६० टक्के उद्ध्वस्त झाले आहे.

-------

१८ गावांत अनियमित वीज पुरवठा

धनज बु.: कारंजा तालुक्यात धनज बु.सह परिसरातील १८ गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. महावितरणचे कर्मचारी हा वीज पुरवठा तात्पुरता सुरळीत करीत असले तरी, आठवडाभरापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने कामकाज ठप्प होत असून, या प्रकारामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

------------

वाशिम-पुसद रस्त्याची अवस्था वाईट

दगड उमरा : वाशिम ते पुसद महामार्गावरील जाभंरूण जहॉगिर फाट्यानजिक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे येथून जाणाºया वाहनधारकांना अडचणींचा सामना करीत मार्ग काढावा लागत आहे. याच कारणामुळे या भागात अनेक अपघातही घडले आहेत. तथापि, बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीची दखल घेतली जात नाही.

------

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

दापुरा: सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून मानोरा तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी सोमवारी करण्यात आली. दापुरा बु., दापुरा खु. भोयणी, नायणी, चौसाळा आदि गावांत ही मोहिम राबविली जात आहे.

---

इंझोरी येथील पथदिवे बंद

इंझोरी: गावातील विविध भागांतील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी अंधारात येजा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन गावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी पोलीस पाटील व ग्रामस्थांनी सोमवारी केली.

===Photopath===

050121\05wsm_5_05012021_35.jpg

===Caption===

धनज परिसरात कांदा लागवडीची तयारी  

Web Title: Preparations for onion cultivation in Dhanaj area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.