जानोरीत कंपोस्ट खताची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:59+5:302021-02-05T09:23:59+5:30
०००००० वढवी येथे आणखी दोन बाधित धनज बु.: कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात दरदिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. ...

जानोरीत कंपोस्ट खताची तयारी
००००००
वढवी येथे आणखी दोन बाधित
धनज बु.: कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात दरदिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आरोग्य विभागाकडून सोमवारी प्राप्त अहवालानुसार वढवी येथील दोघांना कोरोना संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे. आठवडाभरात येथे तिघांना कोरोना संसर्ग झाल्याने गावकऱ्यांत पुन्हा कोरोनाची दहशत पसरली आहे.
००००००
'बेटी बचाओ, बेटी पढाओ'बाबत मार्गदर्शन
धनज बु.: महिला व बालविकास विभागाकडून राष्ट्रीय बालिका दिनाच्या औचित्यावर जिल्हाभरात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’बाबत जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत धनज बु. येथील अंगणवाडी केंद्रात सोमवारी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी महिला व युवतींना मार्गदर्शन केले.
०००००००
माध्यमिक शाळांसाठी नियोजन
कामरगाव : येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. या निर्देशानुसार शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, बुधवारी शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक नियोजन करण्यासाठी कामरगाव येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांची बैठक घेण्यात आली.
००००००
कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
उंबर्डा बाजार : परिसरात यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची तयारी केली आहे. भाजीपालावर्गीय पिकांच्या लागवडीवरही शेतकऱ्यांचा भर असून, कृषी विभागाकडून कांदाचाळ योजनेंतर्गत कांदा पिकाचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याअंतर्गत गत चार दिवसांपासून कांदा लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
०००००
६९ शेतकऱ्यांना जोडणीची प्रतीक्षा
कामरगाव : उपलब्ध जलसाठ्याच्या आधारे सिंचन करून विविध पिकांच्या आधारे स्वत:चा विकास करण्याच्या उद्देशाने कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गतवर्षी महावितरणकडे रितसर अर्ज करून कोटेशनची रक्कमही भरली; परंतु वर्ष उलटले आणि रब्बी हंगाम संपला तरी परिसरातील ६९ शेतकऱ्यांना अद्यापही कृषिपंप जोडणी मिळालेली नाही.