शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार

By संतोष वानखडे | Updated: March 14, 2024 12:59 IST

दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत.

वाशिम : ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना नजीकच्या सरकारी आरोग्य संस्थेत मोफत तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत.

ग्रामीण भागात गर्भवती महिलांना गरोदरपणात आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यावी, याबाबत फारशी माहिती नसते. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गर्भवती महिलांना दर महिन्याला स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी व औषधोपचार मिळण्यातही अनेक अडथळे येतात. गर्भवती महिलांना दर महिन्याला आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले. त्यानुसार यापुढे दर महिन्याच्या ९ तारखेला सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत गर्भवती महिलांची तपासणी केली जाणार आहे. गावात किंवा गावानजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रांत स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत तपासणी होणार असल्याने गर्भवती महिलांची आरोग्यविषयक गैरसोय टळेल, असा विश्वास आरोग्य विभाग बाळगून आहे.कोणत्या तपासण्या मोफत होणार?दर महिन्याच्या ९ तारखेला गरोदरपणात आवश्यक असणाऱ्या सर्व रक्ताच्या तपासण्या, लघवी तपासण्या व इतर तपासण्यादेखील केल्या जाणार आहेत. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणी एक सोनोग्राफीदेखील मोफत करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दर महिन्याच्या नऊ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत. गर्भवती महिलांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात स्त्रीरोग तज्ञांमार्फत तपासणी करून घ्यावी.- डॉ. सुहास कोरेजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :WomenमहिलाPregnancyप्रेग्नंसीdoctorडॉक्टर