आदर्श गावासाठी घेतली महिलांनी प्रतीज्ञा
By Admin | Updated: January 22, 2015 00:10 IST2015-01-22T00:10:46+5:302015-01-22T00:10:46+5:30
कारंजा तालुक्यातील धोत्रा जहाँगीर येथे संकल्प महिला ग्रामसभा उत्साहात; महिलांनी दाखविली एकजुट.

आदर्श गावासाठी घेतली महिलांनी प्रतीज्ञा
कारंजा लाड (जि. वाशिम) : आदर्श गाव प्रकल्प व संकल्प समिती कृषि विभाग पुणे महाराष्ट्र शासन यांच्या वतीने तालुक्यातील धोत्रा जहाँगीरची आदर्श गाव निर्मितीसाठी निवड झाली आहे. नुक त्याच धोत्रा जहाँगीर येथे झालेल्या प्रकल्प ग्रामसभेत आदर्श गाव निर्मितीसाठी महिलांनी एकजूटसह प्रतीज्ञा घेतली. ग्रामसभेला मार्गदर्शक म्हणून जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे यांच्यासह जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर, मीनाताई भोने, पं.स.सदस्य उमाताई थेर, विस्तार अधिकारी साई चव्हाण, माजी पं.स.सदस्य श्यामराव थोरात, सरपंच वैशाली राठोड उपस्थित होते. या प्रसंगी बचतगटाच्या अध्यक्ष व सचिवांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक पी.आर.गव्हाळे तर आभारप्रदर्शन संस्थेचे प्रतिनिधी प्रफुल बानगावकर यांनी केले.