लोणी बु ग्रा.पं.ला प्रधानमंत्री आवास योजना तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:20+5:302021-07-30T04:43:20+5:30
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सभापती सुभाषराव खरात, प्रमुख पाहुणे रिसोड मालेगाव मतदार संघाचे आ.अमित झनक, नायब तहसीलदार ...

लोणी बु ग्रा.पं.ला प्रधानमंत्री आवास योजना तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सभापती सुभाषराव खरात, प्रमुख पाहुणे रिसोड मालेगाव मतदार संघाचे आ.अमित झनक, नायब तहसीलदार नप्ते, गटविकास अधिकारी शृंगारे, हरीमकर आदी मान्यवरांच्या हस्ते महाआवास अभियान अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले .यावेळी लोणी बु. ग्रामपंचायतचे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी ज्योती रजनीश घाटूलकर यांनी कमीत कमी वेळेमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचे घरकूल बांधकाम पूर्ण करून त्यांना प्रथम क्रमांकाचे ऑनलाइन गुणांकन मिळाल्याने त्यांना तालुकास्तरीय प्रथम महा आवास पुरस्कार आमदार अमित झनक, सभापती सुभाष खरात व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच, सचिव यांचाही सत्कार करण्यात आला. लोणी बु. ग्रामपंचायतचे सरपंच सविता प्रवीण बोडखे, प्रवीण बोडखे, सदस्य विनोद पाटील बोडखे, पंचायत समिती सदस्य अश्रुबा नवले, सचिव प्रल्हाद घुगे आदीना देखील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सर्व सदस्य सदस्या उपस्थित होते. तसेच सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातून उत्कृष्ट काम करणारे पंचायत समिती रिसोडमधील घरकूल विभागाचे चिंचंबाभर सर्कलचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जितेंद्र देशमुख यांचा ही उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अमित झनक यांनी तसेच सुभाष खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अभियंता इंगोले यांनीही योजनेची व्याप्ती समजावून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गजानन पाचरने यांनी तर प्रास्ताविक झरांडे यांनी केले.