शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

माती परीक्षण क्षेत्रातही महिलांची दमदार 'एन्ट्री'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 11:05 AM

Washim News महिलांनी बीजप्रक्रिया, माती परीक्षण, बांधावर खत व बियाणे पुरविण्याच्या कृषी क्षेत्रातही दमदार एन्ट्री केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुरुषप्रधान संस्कृतीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर नारीशक्ती वेगवेगळ्या पैलूंच्या माध्यमातून वेगवेगळया रूपात समोर येत आहे. कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रांत महिलाही चमकदार कामगिरी करीत असून, सरत्या वर्षापासून महिलांनी बीजप्रक्रिया, माती परीक्षण, बांधावर खत व बियाणे पुरविण्याच्या कृषी क्षेत्रातही दमदार एन्ट्री केली आहे. ‘कोरोना’मुळे अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरत्या वर्षातील खरीप हंगामात बांधावर खत, बियाणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने राबविला. या उपक्रमाला जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानातील कृषी सखींच्या सहकार्याची जोड देण्यात आली. जिल्ह्यात ९२ ग्रामसंघ व १७८६ समूह, १०० पेक्षा अधिक कृषी सखी आहेत. खरीप हंगामात ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खत व बियाणे’ हा उपक्रम महिलांनी यशस्वी करून दाखविला. कृषी विभागातर्फे कृषी सखींना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले. बियाणे व खताच्या नोंदी घेणे, एकत्रित बियाणे व खते खरेदी करणे व त्याची कृषी विभागाने तयार केलेल्या संकेतस्थळवर नोंद करणे तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमधून माती परीक्षण नमुने घेणे, गावस्तरावर शेतकऱ्यांच्या बियाण्यांवर बीजप्रक्रिया करणे इत्यादी कार्य उमेद अभियानातील कृषी सखी, समूह व ग्रामसंघातील महिला सदस्य करीत आहेत. यापुढेही कृषी क्षेत्रातील माती परीक्षण, बीजप्रक्रिया यांसह अन्य उपक्रमांत महिलांचा सहभाग वाढविण्याचा मानस कृषी विभागाने व्यक्त केला. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमWomenमहिला