शॉट सर्किटमुळे विद्युत पुरवठा ठप्प
By Admin | Updated: May 12, 2015 01:16 IST2015-05-12T01:16:37+5:302015-05-12T01:16:37+5:30
रिसोड येथील प्रकार.

शॉट सर्किटमुळे विद्युत पुरवठा ठप्प
रिसोड : स्थानिक पोलीस स्टेशनसमोर असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत पोलवरील तारेची लगातार तीन दिवसांपासून वारंवार सायंकाळच्या सुमारास शॉट सर्किट होत असल्यामुळे सदर भागातील विद्युत सेवा ठप्प होत आहे. विद्युत महावितरण कंपनीची मेन लाईनवरील अगदी भररस्त्यावर न.प. व पो.स्टे. समोरील विद्युत पोलवरील दररोज स्पार्कींग होत आहे. यामुळे विद्युत सेवा वारंवार बंद होत आहे. या प्रकारामुळे या भागातील नागरिक व ग्राहक वर्गाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बाबीकडे कंपनीचे कमालीचे दुर्लक्ष होत असून या भागातील नागरिकांनी कल्पना देऊनही विद्युत सेवा सुरळीत करण्यास दिरंगाई केल्या जात आहे. या भागात राहणार्या नागरिकांनी महावितरण कंपनीकडे सूचना केल्यानंतरही याची दखल घेतल्या जात नसल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.