शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा अनियमित; सिंचन क्षेत्र प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:55 IST

रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात व सलग वीजपुरवठा मिळत नसल्याने सिंचन क्षेत्र प्रभावित होत आहे. जादा वीज भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे शेतकरी वैतागले आहेत.यावर्षी शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी हंगामावर खिळल्या आहेत. रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. सिंचनाची सुविधा असणाºया बहुतांश शेतकºयांनी गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली आहे. या पिकांना सिंचन करण्यासाठी सलग तसेच पुरेशा दाबात वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. कमी-अधिक विद्युत दाब होत असल्याने मोटारपंप जळण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. अनसिंग सर्कलमधील अनेक शेतकºयांना कोटेशनचा भरणा करूनही कृषीपंप जोडणी मिळाली नाही तसेच काही शेतकºयांनी मागणी करूनही नवीन विद्युत रोहीत्र मिळाले नाही. रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. केनवड उपकेंद्रातील पाच पेक्षा अधिक विद्युत रोहित्र बंद अवस्थेत असल्याने शेतकºयांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी कळंबेश्वरचे सरपंच प्रदीप पाटील मोरे यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याकडे केली होती. यावर अद्यापही ठोस तोडगा निघाला नाही. रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातही जादा भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे प्रकल्प, नदी, बॅरेज, विहिरी, शेततळ्यात पाणी असूनही सिंचन करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात तीन मध्यम आणि १३३ लघू प्रकल्प व बंधारे मिळून १३६ प्रकल्प आहेत. यामधून सिंचन करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याशिवास विहिरी, शेततळे याच्या माध्यमातून सिंचन करता येते. परंतू, अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचन प्रभावित होत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेतीFarmerशेतकरी