वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 19:40 IST2017-08-18T19:38:55+5:302017-08-18T19:40:23+5:30
कारंजा लाड - तालुक्यातील ग्राम लोणी अरब शेती परिसरात असलेल्या विद्युत रोहीत्रावरून विद्युत पुरवठा विज कंपनीने खंडित केला आहे. परिणामी शेती सिंचनाचे काम थांबले आहे.

वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड - तालुक्यातील ग्राम लोणी अरब शेती परिसरात असलेल्या विद्युत रोहीत्रावरून विद्युत पुरवठा विज कंपनीने खंडित केला आहे. परिणामी शेती सिंचनाचे काम थांबले आहे.
सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने पीक परिस्थिती भयावह आहे. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी पाणी देऊन पिके वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. नेमके याच वेळी लोणी येथील शेत परिसरातील विद्युत पुरवठा महावितरणच्या अभियंत्यांनी खंडित केला. सदर विद्युत पुरवठा पूर्ववत करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी अनिल बागडे, महादेव वाघमारे, प्रमिला गडेकर, सुरेंद्र गडेकर, वामन शेजव, अजाबराव आंधळे यांनी महावितरणच्या अभियंत्यांकडे १८ आॅगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली आहे.