कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST2021-03-13T05:16:53+5:302021-03-13T05:16:53+5:30
मानोरा : सध्या परिसरात रबी हंगामात गहू, हराभरा, भूइमूग, ज्वारी ही पिके व फळबाग मोठ्या प्रमाणात आहे.उन्हाचा तडाखा असल्याने ...

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करू नये
मानोरा : सध्या परिसरात रबी हंगामात गहू, हराभरा, भूइमूग, ज्वारी ही पिके व फळबाग मोठ्या प्रमाणात आहे.उन्हाचा तडाखा असल्याने या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मात्र, वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांकडे थकित बिल असल्याने वीज कापत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा कापू नये, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महावितरणकडे १२ मार्च राेजी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, एका ट्रांसफॉर्मरवर अंदाजे १० कनेक्शन असतील तर १० शेतकऱ्यांनी वीज देयक भरले पाहिजे, असे बंधनकारक केले आहे. मात्र, जे शेतकरी वीजबिल भरायला तयार आहेत, त्यांचेही कनेक्शन कापले जात आहे. हा प्रकार थांबवा अन्यथा प्रहार संघटना आंदोलन करेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर शाम पवार, प्रा.ओम बालोदे, प्रतीक संजय ठाकरे, हितेश राठोड, नितेश लवटे, युवराज राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.