वीज रोहित्र बंद; सिंचन प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:22+5:302021-02-13T04:39:22+5:30

.............. मानव विकास मिशनची बसफेरी बंद मालेगाव : विद्यार्थिनींना शाळेत नेण्यासाठी मानव विकास मिशनची बसफेरी महत्त्वपूर्ण ठरते. ...

Power off Rohitra; Irrigation affected | वीज रोहित्र बंद; सिंचन प्रभावित

वीज रोहित्र बंद; सिंचन प्रभावित

..............

मानव विकास मिशनची बसफेरी बंद

मालेगाव : विद्यार्थिनींना शाळेत नेण्यासाठी मानव विकास मिशनची बसफेरी महत्त्वपूर्ण ठरते. किन्हीराजा परिसरात मानव विकास मिशनची बस येत नसल्याने गैरसोय होत आहे.

...........

शेतकरी पीक कर्जापासून वंचित

मेडशी: शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणीकरण करता आले नाही. असे २१ शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत.

............

बीएसएनएलची सेवा अनियमित

जउळका : गेल्या आठवडाभरापासून परिसरात बीएसएनएलची दूरसंचार सेवा अनियमित आहे. वारंवार ही सेवा ठप्प होत असल्याने बँक व्यवहारांसह अडचणी येत आहेत.

............

हरभरा पिकात वन्यप्राण्यांचा हैदोस

किन्हीराजा : परिसरात सध्या रबी पिके डौलदार आहेत; परंतु वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यात गुरुवारी रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे.

Web Title: Power off Rohitra; Irrigation affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.