शेतकऱ्यांची वीज खंडित करणे तात्काळ बंद करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:23 IST2021-03-29T04:23:01+5:302021-03-29T04:23:01+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व रासपचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांच्या सूचनेनुसार रासप ...

शेतकऱ्यांची वीज खंडित करणे तात्काळ बंद करावे
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व रासपचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांच्या सूचनेनुसार रासप वाशिम जिल्हा प्रभारी योगेश नप्ते पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की शेती मालाचे कमी असलेले बाजारभाव, कोरोनामुळे संकटात असलेले अर्थकारण शेतकरी, शेतमजूर, कामगार, बारा बलुतेदार, कारागीर, व्यावसायिक अत्यंत आर्थिक अडचणीत आहेत. अशातच महावितरण कंपनीने अंदाजे आकारलेले भरमसाठ वीजबिल यामुळे ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. वीज कनेक्शन पूर्ववत जाेडून द्यावे अन्यथा आंदाेलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे वाशिम जिल्हा प्रभारी योगेश नप्ते पाटील व युवक जिल्हा सचिव शंकर पातळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.