पाझर तलावातील स्वखर्चाने केला गाळाचा उपसा
By Admin | Updated: April 13, 2017 13:20 IST2017-04-13T13:20:30+5:302017-04-13T13:20:30+5:30
पाझर तलावामधून शेतकरी ग्रामस्थांनी स्वखर्चाने हजारो ट्रॉली गाळाचा उपसा करुन शेतामध्ये टाकून वाशिम जिल्हयामध्ये कोंडाळामहाली वासियांनी आदर्श निर्माण केला.

पाझर तलावातील स्वखर्चाने केला गाळाचा उपसा
कोंडाळा ग्रामस्थांनी जिल्हयात केला आदर्श निर्माण
कोंडाळा महाली : येथील गाव पाझर तलावामधून शेतकरी ग्रामस्थांनी स्वखर्चाने हजारो ट्रॉली गाळाचा उपसा करुन शेतामध्ये टाकून वाशिम जिल्हयामध्ये कोंडाळामहाली वासियांनी आदर्श निर्माण केला असून शासनाचा लाखो रुपयाचा खर्च वाचवून जलसंधारणाचे महत्वपुर्ण काम केले आहे पंरतु जलयुक् शिवारचा गाजावाजा करणाऱ्या शासनाला याबाबातची पुसटची कल्पना सुद्धा नाही.
कोंडाळा महाली गावाची गेल्यावर्षी २०१५/१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवड केली होती परंतु कृषि विभागाने याबाबत खोडा घालून कोंडाळामहाली हे गाव वॉटर न्युट्रल मध्ये २०१६/१७ समाविष्ट केल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातून वगळले आहे कृषि विभागाने गावाची लोकसंख्या, जनावारांची संख्या, शेळया, कोंबडया यांना लागणारे पाणी तसेच सोयाबीन तुर पिकाला लागणारे पाणी किती टिसीएम पाहीजे आणि तेवढे पाणी उपलब्ध असल्याचा अहवल शासनाला सादर केला त्यामुळे कोंडाळामहाली वॉटर न्युट्रलमध्ये समाविष्ट करुन जलयुक्त शिवारमधून वगळयात आले सध्या गाव/ पाझर तलावामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नसल्यामुळे गुरा ढोरांना पाण्यासाठी वणवाण भटकावे लागते तसेच जलयुक्त शिवारामधून गावाला वगळल्यामुळे जलसंधाराची कोणतीच कामे कोणत्याच योजनेमधून किंवा कोणत्याही विभागाकडून यावर्षी करण्यात आली नाहीत परंतु कोंडाळामाली येथील शेतकरी ग्रामस्थांनी पाण्र तलाव आटल्यानंतर शासनाची वाट न पाहता हजारो ट्रॉली गाळाचा उपसा स्वखर्चाने करुन वाशिम जिल्हयामध्ये आदर्श निर्माण केला आहे.