मुख्य मार्गांवर उभ्या गिट्टीसिमेंट मिक्सर मुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:44 IST2021-03-23T04:44:06+5:302021-03-23T04:44:06+5:30

कारंजा - दारव्हा मार्गांवरील रेल्वे फाटकासमोरील पाॅवर स्टेशनजवळ गेल्या दोन दिवसांपासून एक सिमेंट गिट्टी मिक्स करणारे चारचाकी वाहन ...

Possibility of accident due to vertical ballast mixer on main roads | मुख्य मार्गांवर उभ्या गिट्टीसिमेंट मिक्सर मुळे अपघाताची शक्यता

मुख्य मार्गांवर उभ्या गिट्टीसिमेंट मिक्सर मुळे अपघाताची शक्यता

कारंजा - दारव्हा मार्गांवरील रेल्वे फाटकासमोरील पाॅवर स्टेशनजवळ गेल्या दोन दिवसांपासून एक सिमेंट गिट्टी मिक्स करणारे चारचाकी वाहन नादुरुस्त अवस्थेत मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर उभे आहे .या मार्गांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

कारंजा ते दारव्हा मार्गांवरील रेल्वे फाटकासमोरील पाॅवर स्टेशनजवळ गेल्या दोन दिवसांपासून पिवळ्या रंगाचे गिट्टी सिमेंट मिक्स करणारे चारचाकी वाहन नादुरुस्त अवस्थेत वाहतुकीच्या रस्त्यावर उभे आहे. विशेष म्हणजे सदर चारचाकी मुख्य रस्त्यावर बंद अवस्थेत उभे असल्याने वाहतुकीस अडथडा निर्माण करणारे ठरत आहे.

तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गानी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन रस्यावरील गिट्टी सिमेंट मिक्स करणारे चारचाकी वाहन त्वरीत हटविण्याची मागणी प्रवासी वाहनचालकांच्यावतीने करण्यात आली आहे.

Web Title: Possibility of accident due to vertical ballast mixer on main roads