लोंबकळत असलेल्या तारेमुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:37 IST2021-03-15T04:37:05+5:302021-03-15T04:37:05+5:30
तालुक्यातील चिखली येथील शेतकरी नीलेश श्रीराम राठोड यांच्या गट नं. ४२ मध्ये ओलिताची शेती असून शेतकरी नीलेश राठोड ...

लोंबकळत असलेल्या तारेमुळे अपघाताची शक्यता
तालुक्यातील चिखली येथील शेतकरी नीलेश श्रीराम राठोड यांच्या गट नं. ४२ मध्ये ओलिताची शेती असून शेतकरी नीलेश राठोड हे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत विजेच्या साहाय्याने कृषी पिके घेत असतात.
नीलेश राठोड यांच्या विद्युत पंपासाठी शेतामधून वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारा गेलेल्या असून या तारा जमिनीपासून वीज वितरण कंपनी प्रशासनाच्या निकषानुसार उंचीवर ओढलेल्या नसल्याने शेतकरी नीलेश राठोड आणि त्यांच्या शेतात राबणाऱ्या मजुरांसोबत लोंबकळत असलेल्या तारांमुळे गंभीर अथवा जीवघेणा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
वीज वितरण कंपनी प्रशासनाने आपल्या शेतामध्ये वीज वाहून नेणाऱ्या आणि लोंबकळत असलेल्या तारा व्यवस्थित ओढून सहकार्य करण्याची अपेक्षा नीलेश राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.