मुख्य लिपीक ‘एसीबी’च्या ताब्यात
By Admin | Updated: February 6, 2016 02:31 IST2016-02-06T02:31:09+5:302016-02-06T02:31:09+5:30
कारंजा येथील सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या मुख्य लिपिकास लाच मागीतल्याप्रकरणी ताब्यात घेतले.

मुख्य लिपीक ‘एसीबी’च्या ताब्यात
कारंजा (जि. वाशिम) : महिला तक्रारदारास तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी येथील सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या मुख्य लिपिकास ५ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. मनोज रघुनाथराव सोनूलकर (३९ रा. रंगारीपुरा) असे मुख्य लिपीकाचे नाव आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, लिपिक सोनूलकर यांनी त्यांना पात्रता नसताना बढती झाली, अशी नोटीस मिळाली. त्या नोटीसचे उत्तर मी सांगतो तसे द्या, बाकी मी सांभाळून घेतो. त्याकरिता मला दोन हजार पाचशे रुपये द्या, अशी मागणी केली. या तक्रारीवरून वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी कारंजा येथे येऊन सापळा रचला. लिपीकाने लाचेची रक्कम वाढवून तीन हजार रुपयांची मागणी करुन सहाय्यक निबंधक कार्यालयातील शिपाई सांगळे यांच्याकडे लाच रक्कम देण्यास सांगितले; परंतु तक्रारदाराने संबंधित शिपायाकडे रक्कम देण्याचे टाळले. त्यामुळे ही कारवाई थांबविण्यात आली; परंतु लोकसेवक सोनूलकर यांनी पदाचा दुरुपयोग करुन स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी तक्रारदारास तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आले. या कारणावरुन वाशिम ह्यएसीबीह्णने मुख्य लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये ताब्यात घेतले आहे. ही कारवाई वाशिम एसीबीचे पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही.गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात इतर अधिकारी व कर्मचार्यांनी केली.