शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी आवश्यक - प्रा.हरिभाऊ क्षीरसागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 4:57 PM

 ‘अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्नची माझा देव, या देवाचे पूजन करिता नित्य येतसे चेव’ या कवितेप्रमाणे कार्य केले तर कोणतीच बाब अवघड नाही. युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण होणे आवश्यक आहे.

वाशिम  : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.हरिभाऊ क्षीरसागर हे गांधीवादी म्हणुन ओळखले जातात. एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, गोरक्षणाचे कार्याध्यक्ष, सर्वोदयाचे जिल्हाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष अशा विविध भूमिका ते पार पाडत आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद...

- समाजसेवेची आवड आपल्याला कशी निर्माण झाली ? विद्यार्थी दशेत असतांना गो.से. महाविद्यालय वर्धा येथे डॉ. ठाकुरदासजी बंग यांच्या मार्गदर्शनामुळे समाजोपयोगी कार्याची ओळख झाली. त्यातुनच पू. विनोदबाजी भावे यांचाही सहवास लाभला. तव्दतच राजस्थान आर्य महाविद्यालयात नोकरीवर असताना नापुर विद्यापिठाचे माजी कुलगुुरु दादासाहेब काळमेघ यांच्याकडून समाजसेवेचा वसा मिळाला.

- आपल्या विविध उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगा ?सन १९७२ ला एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन, समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणुन वाशिमची पहिली इंग्रजी शाळा सुरु केली. नागपुर आणि अमरावती विद्यापिठाचा रासेयो समन्वयक म्हणुन विदर्भभर विविध उपक्रम राबवता आले. दिलीप गोरे रामकृष्ण सेवा समितीच्या माध्यमातुन मागील १५ वर्षापासुन गोरक्षणाचे कार्य सुरु आहे. सवंगडयांसमवेत, मोक्षधामाचे काम करतो. विदर्भ साहित्य संघाचा शाखाध्यक्ष म्हणुन विविध साहित्य विषयक उपक्रम वर्षभर चालु असतात. मी गांधीवादी असल्याने सर्वोदय मंडळामार्फत गांधी विचार समाजात पेरण्याचे कार्य करतो. गांधीजीची दीडशेवी जयंती रचनात्मक, उपक्रमांनी जिल्हयात यावर्षी साजरी करायची आहे. सर्व सेवा संघाने भुदान यज्ञ मंडळावर नियुक्ती केली आहे.

- तुम्ही सुरु केलेल्या ‘हरि’ व्याख्यानमालेबद्दल काय सांगाल ?समाज प्रबोधनाच्या हेतुने सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीतून हरि व्याख्यानमाला सुरु केली आहे. पुढील वर्षी हरी व्याख्यानमालेला आता वीस वर्ष पूर्ण होतील. आतापर्यंत महाराष्ट्रातील सुपरिचीत व्याख्याते येथे येऊन गेले आहेत. य व्याख्यानमालेला प्रतिष्ठा लाभत असुन श्रोते तिची दरवर्षी वाट पाहतात.

- आजच्या तरुण पिढीला कोणता संदेश द्याल ? ‘अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्नची माझा देव, या देवाचे पूजन करिता नित्य येतसे चेव’ या कवितेप्रमाणे कार्य केले तर कोणतीच बाब अवघड नाही. युवकांमध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण होणे आवश्यक आहे. आज युवकांमध्ये नकारात्मक वाढीस लागली असुन रड्या लोकांची संख्या वाढत आहे. युवकांनी यापासुन अलिप्त असावे, असे वाटते.ाा शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत