गणेश विसर्जन मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST2021-07-11T04:27:50+5:302021-07-11T04:27:50+5:30
वाशिम शहराला गणेशोत्सवाची आगळीवेगळी परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, त्या लोकमान्य टिळकांच्या हस्ते ८ फेब्रुवारी ...

गणेश विसर्जन मार्गाची दुरवस्था
वाशिम शहराला गणेशोत्सवाची आगळीवेगळी परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, त्या लोकमान्य टिळकांच्या हस्ते ८ फेब्रुवारी १९१८ रोजी वाशिममध्ये राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली होती. त्यास यंदा १०३ वर्षे पूर्ण होत आहेत. या मंडळाकडून दरवर्षी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात. यासह इतर गणेशोत्सव मंडळांकडून जनजागृतीपर कार्यक्रमांची रेलचेल असते. शेवटच्यादिवशी ट्रकवर गणेशाची मूर्ती विराजमान करून शिवाजी चाैक, बालू चाैक, राजनी चाैक, मन्नासिंह चाैक, माहुरवेस, दंडे चाैक यामार्गे बालू चाैकातील देवतलावात गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. या विसर्जन मार्गाची आजमितीस मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे ‘चेंबर’ रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक वर आले आहेत. यासह ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागते. अशावेळी गणपती विसर्जन मिरवणुकीतही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेने ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.