लोकवर्गणीतून काढला तलावातील गाळ
By Admin | Updated: May 31, 2014 00:50 IST2014-05-31T00:22:35+5:302014-05-31T00:50:43+5:30
उमरा येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करुन तलावातील गाळ काढण्याच्या कार्याला शुभारंभ केला.

लोकवर्गणीतून काढला तलावातील गाळ
अनसिंग : तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढावी तसेच पाण्याचा नागरिकांना जास्त प्रमाणात फायदा घेता यावा याकरीता उमरा (शम.) येथील गावकर्यांनी लोकवर्गणी करुन तलावातील गाळ काढण्याच्या कार्याला गुरूवार, २९ मे रोजी शुभारंभ केला आहे. तलावातील गाळ काढण्याच्या या कामासाठी उद्घाटक म्हणून वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर प्रामुख्याने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर यांनी जे.सी.बी. मशिनची पुजा करुन या कामाचा शुभारंभ केला. तसेच लोकवर्गणी करण्यासाठी घेतलेल्या उमरा (शम) येथील नागरिकांची स्तुती करुन सत्कार केला. शेतकर्यांना सहकार्यातून ग्रामविकासाची संकल्पना समजावून सांगितली. गावाच्या विकासात्मक कामासाठी सर्वांचे सहकार्य किती महत्वाचे आहे याची माहिती अमानकर यांनी उपस्थित शेतकर्यांना पटवून दिली. तसेच लोकवर्गणीतून केलेल्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले.