मतदान यंत्रे तिहेरी सुरक्षा कवचात

By Admin | Updated: October 18, 2014 01:12 IST2014-10-18T01:12:20+5:302014-10-18T01:12:20+5:30

कॅमेराची नजर : केंद्रीय आणि राज्य राखीव दलाचे जवान तैनात.

Polling equipment triple protection | मतदान यंत्रे तिहेरी सुरक्षा कवचात

मतदान यंत्रे तिहेरी सुरक्षा कवचात

वाशिम : जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड मतदारसंघातील मतदान यंत्र तिहेरी सुरक्षा कवचात प्रत्येक ठिकाणच्या मतमोजणी केंद्रावर ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून, संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर आहे. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड मतदारसंघात १५ ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील ६0.६७ टक्के मतदारांनी ५७ उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रानिक्स मतदान यंत्रामध्ये बंद केले आहे. मतमोजणी १९ ऑक्टोंबरला होणार असल्याने तोपयर्ंत मतपेट्यांची सुरक्षा करावी लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यासाठी राज्य राखीव पोलिस दलाचीही मदत घेण्या त आलेली आहे. वाशिम येथील ऑफिसर क्लव, रिसोड येथील पंचायत समिती सभागृह व कारंजा येथील शेतकरी निवासामध्ये सदर इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. पोलीसांनी या तिन्ही ठिकाणांना लाकडी कठडे निर्माण केले असून, बंदुकधारी पोलिस या यंत्राची रक्षा करीत आहेत.

Web Title: Polling equipment triple protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.