कुरघोडीचे राजकारण !

By Admin | Updated: September 5, 2014 23:45 IST2014-09-05T23:45:12+5:302014-09-05T23:45:12+5:30

कारंजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराचे कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे चित्र.

The politics of turmoil! | कुरघोडीचे राजकारण !

कुरघोडीचे राजकारण !

वाशिम : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघाकरीता होत असलेल्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून तयार असताना कारंजा विधानसभा मतदार संघात मात्र शिवसेनेतर्फे कोणत्याच प्रकारच्या हालचाली दिसून येत नव्हत्या. गत दोन दिवसांपासून अचानक शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांसह शिवसेनेतीलच दुखावलेल्या काहींनी कुरघोडीचे राजकारण सुरू केल्याचे चित्र आहे.
वाशिम लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व खा. भावना गवळी करताहेत. यांच्यावतिने इच्छुक असलेला उमेदवार काही जणांना पसंत नसावा किंवा आ पल्याला पक्ष डावलत आहे म्हणून काहींनी पक्षङ्म्रेष्ठीकडे फिल्डींग लावली आहे. तर काहींना आपल्या गटाचा उमेदवार पाहिजे असल्याने त्यांनी चक्क हायकमांडच्या भेटी घेण्या सुरू केल्या असून त्याचे छायाचित्र ह्यव्हॉटस अँपह्णवर सुध्दा टाकलेले आहेत. वाशिम जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघापैकी रिसोड व वाशिम विधानसभा मतदार संघ भाजपाकडे तर कारंजा विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. रिसोड विधानसभा मतदार संघात शिवसंग्रामच्यातिने प्रयत्न चालू आहेत याला काही शिवसैनिकांचे सहकार्य असल्याची चर्चा आहे. वाशिम विधानसभा मतदार संघात कुठेही शिवसेना निवडणुक लढविण्यास इच्छूक आहे किंवा तशी मागणी झालेली दिसून येत नाही. रिपाइं आठवले गटातर्फे मात्र यावेळीच्या निवडणुकीसाठी सोडण्याची जोरदार मागणी आहे. याकरीता येथील पदाधिकारी यांनी रिपाइंचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेवून मतदार संघांचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. रिपाइं चे पदाधिकारी यावेळी वाशिम विधानसभा मतदार संघ आम्हालाच सुटणार असल्याचे सांगत आहेत. शिवसेना मात्र ठरल्याप्रमाणे कारंजा विधानसभा मतदार संघात उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असतांना अंतर्गत वादामुळे उमेदवारी कोणाला दिल्या जाईल हे सांगता येत नसले तरी कधीकाळी शिवसेनेत असलेले एक नेते तिकीट मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांच्या मधात अनेक आठकाठी येत असल्याने ह्यतुले नाही तं मले नाहीह्ण असा पवित्रा त्यांनी घेतल्याचे राजकीय वतरुळात बोलल्या जात आहे. शिवसेनेच्यावतिने इच्छूक असलेल्या उमेदवारांमध्ये स्पर्धा लागल्याने आपल्यालाच तिकीट मिळावी याकरीता पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर आपल्याला तिकीट मिळत नाही याची कल्पना झालेल्यांनी अनेक दुसरे इच्छूक पुढे केले आहेत. त्यांची भेट सुध्दा पक्षङ्म्रेष्ठींशी घालून दिली आहे. या कुरघोडीच्या प्रकारामुळे शिवसेनेची कारंजा विधानसभा मतदार संघाची ितकीट कोणाला मिळेल हे सांगता येत नसले तरी कारंजा विधानसभा मतदार संघासह जिल्हयातील सर्व नागरिकांचे याकडे लक्ष लागलेले दिसून येत आहेत.

*** कारंजा विधानसभा मतदार संघ शिवसेनेसाठी असल्याने सर्व हालचाली या मतदार संघात मोठया प्रमाणात होत आहेत. एकच मतदार संघ असल्याने इच्छुक उमेदवार एकमेकांवर कुरघोडी करीत पक्षङ्म्रेष्ठींची भेट घेवून आपली गार्‍हाणे व आपण कसे प्रबळ उमेदवार ठरू शकतो या संदर्भात चर्चा केल्या जात आहे. कारंजा विधानसभा उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The politics of turmoil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.