नगराध्यक्ष आरक्षणाने राजकीय समीकरण बदलले!

By Admin | Updated: April 15, 2015 01:13 IST2015-04-15T01:13:59+5:302015-04-15T01:13:59+5:30

वाशिम नगराध्यक्षपदाची जागा खुला प्रवर्ग महिलाकरिता; मंगरुळपीर, कारंजात राजकीय चित्र बदलणार.

Political equation changed with municipal reservation! | नगराध्यक्ष आरक्षणाने राजकीय समीकरण बदलले!

नगराध्यक्ष आरक्षणाने राजकीय समीकरण बदलले!

वाशिम : नगरविकास विभागाने १३ एप्रिल रोजी राज्यातील विविध नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले. त्यात वाशिम जिल्हय़ातील ३ नगरपालिकांचाही समावेश आहे. या आरक्षणानुसार, वाशिम नगरपालिकेसाठी ह्यजैसे थेह्ण स्थिती असून, येथील नगराध्यक्षपदाची जागा खुला प्रवर्ग महिलाकरिता आरक्षित ठेवण्यात आली आहे; मात्र मंगरुळपीरमध्ये खुल्या प्रवर्गाऐवजी आता इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले असून, कारंजा लाड येथे सलग १५ वर्षानंतर बदल झाला आहे. नव्या आरक्षणानुसार येथे अनुसूचित जाती महिलेस नगराध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाशिम नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षपदी इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लता उलेमाले कारभार पाहत आहेत. यापूर्वीचे अडीच वर्षे रेखा शर्मा यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सोमवारी जाहीर झालेल्या नव्या आरक्षणानुसार यापुढेही नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेकरिता राखीव निघाल्याने अनेक दिग्गज पुरुष पदाधिकार्‍यांनी नाराजी दर्शविली आहे. यापाठोपाठ मंगरुळपीर नगरपालिकेतील नगराध्यक्षपद ओबीसी व्यक्तीकरिता राखीव निघाले आहे. विद्यमान नगराध्यक्षपदी खुल्या प्रवर्गातील चंदू परळीकर हे नगराध्यक्षपदी विराजमान आहेत. या आरक्षणामुळे इतर समाजघटकांतील पदाधिकार्‍यांचा काहीसा हिरमोड झाला आहे; परंतु शासनाच्या हा आदेश स्वागतार्ह असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या नगरपालिकेत प्रामुख्याने ओबीसी, खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय या तीन प्रवर्गांंकडेच बहुतांशवेळा नगराध्यक्षपद राहिल्याचा पूर्वेतिहास आहे. कारंजा नगरपालिकेसंदर्भातील स्थितीचे निरीक्षण केल्यानंतर असे आढळून आले, की गत १५ वर्षांंंनंतर कारंजाचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. यापूर्वी अरुणा डेंडुळे यांना अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. आता १५ वर्षानंतर पुन्हा येथील नगराध्यक्षपद भुषविण्याची संधी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेस मिळणार आहे. त्यामुळे या घटकातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: Political equation changed with municipal reservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.