पोलिसांची ‘व्हिजीट’बंद
By Admin | Updated: December 9, 2014 23:40 IST2014-12-09T23:40:45+5:302014-12-09T23:40:45+5:30
वाशिम जिल्ह्यात किरकोळ चोरीच्या सत्रामध्ये वाढ.

पोलिसांची ‘व्हिजीट’बंद
वाशिम : शहरामध्ये अनुचित प्रकाराला व चोरीला आळा घालण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक सुधिर हिरेमठ यांनी ह्यव्हिजीट डायरीह्ण सुरू केली होती. या डायरीमुळे छोटया मोठया चोर्यांना बर्याच प्रमाणात आळा बसला होता. ही डायरी सद्यास्थितीत बंद झाली असून ती सुरू करण्याची गरज दिवसेंदिवस होत असलेल्या चोर्यांमुळे निर्माण झाली आहे.
जिल्हयात चोर्यांचे सत्र मोठया प्रमाणात दिसून येत आहे. यामध्ये जवळपास जास्तीत जास्त चोर्या हया भुरटया चोर्या आहेत. या भुरटया चोरांवर अंकुश लावण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक सुधिर हिरेमठ यांनी सुरू केलेली पोलीस व्हिजीट डायरी प्रभावी ठरू शकते. ज्यावेळी जिल्हयात ही मोहीम राबविण्यात आली तेव्हा मोठया प्रमाणात चोरीच्या घटनांना आळा बसला होता. सद्यास्थितीत नविन वसाहतीमध्ये बांधकाम साहित्य चोरीस जाण्याच्या घटनेमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. १ क्विंटल गज, काही सिमेंटचे पोते यासह बांधकाम साहित्याची चोरी मोठया प्रमाणात होत आहे. ही चोरी शक्यतोवर रात्री १ ते २ वाजताच्या दरम्यान घडत आहेत. यावर अंकुश घालण्यासाठी पोलीसांची रात्रीच्या गस्तीदरम्यान नविन वसाहतीसह ईतर ठिकाणी भेटी देणे आवश्यक आहे. पूर्वी रात्री १ वाजता, २.३0 वाजता व ३.३0 वाजताच्या दरम्यान गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी प्रत्येक वसाहतीमध्ये जावून नेमून ठेवण्यात आलेल्या डायरीवर कितीवाजता भेट दिली व काय आढळून आले याचा तपशील लिहून स्वाक्षरी मारायचे. नविनच असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनीही ही पध्दत सुरू करून जिल्हयात होत असलेल्या चोर्यांच्या घटनेला आळा घालणे गरजेचे आहे.
*डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घडलेल्या काही महत्वाच्या घटना
जिल्हयात शेतीसाठी लागणारे साहित्यासह किरकोळ चोर्यांच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. नविन तयार होत असलेल्या वसाहतीमधून अनेकांचे बांधकाम साहित्य चोरीला गेले मात्र पोलीसांच्या भानगडीत न पडलेले बरे म्हणून तक्रार देण्यास टाळले. या चोर्यांना आळा घालण्यासाठी डायरी पध्दत सुरू करणे गरजेचे आहे. गत आठवडयात जिल्हयात घडलेल्या घटनांमध्ये व्याड येथे ४४ हजार रूपयांची चोरी, चाकोली शेतशिवारातून शेतीसाहित्य ५ हजार, कवठा येथे १0 हजाराची घरफोडी, मालेगाव तालुक्यातील व्यायाम शाळेत ६ हजाराची चोरी, मालेगाव येथील पावर हाऊसमध्ये ५0 हजाराची चोरी तर रिसोड येथे ६ लाख रूपये चोरीचा समावेश आहे.
* आठवडयातून तपासली जायची डायरी
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांनी सुरू केलेली डायरी पध्दतीचे संपूर्ण जिल्हयात कौतूक करण्यात आले होते. विशेष म्हणजे दर आठवडयाला संपूर्ण डायर्या बोलावून त्याची तपासणी खुद्द ते करून काही त्रुटी आढळल्यास त्यामध्ये बदल घडवून आणायचे. अनेकांना डायरी व्यवस्थित न हाताळल्याबद्दल तंबी सुध्दा मिळाली होती.