लोटाबहाद्दरांना पोलीस स्टेशनची वारी !

By Atul.jaiswal | Updated: August 18, 2017 13:40 IST2017-08-18T13:39:41+5:302017-08-18T13:40:46+5:30

police take action against people dont use toilets | लोटाबहाद्दरांना पोलीस स्टेशनची वारी !

लोटाबहाद्दरांना पोलीस स्टेशनची वारी !

ठळक मुद्देधडक मोहिमेत ७७ लोटाबहाद्दरांना पकडले.एकूण ४२०० हजारांचा दंड 'ऑन दी स्पॉट' वसूल केला

वाशीम  - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने अनसिंग परिसरात शुक्रवारी पहाटे ५ वाजतापासून राबविलेल्या धडक मोहिमेत ७७ लोटाबहाद्दरांना पकडले. या सर्वांना अनसिंग पोलीस स्टेशनच्या कोठडीत तात्पूरत्या स्वरुपात ठेवण्यात आले. १२०० रुपये दंड जमा केल्यानंतर समज देऊन सोडून दिले.
३५ जणांकडून प्रत्येकी १२०० रुपयाप्रमाणे एकूण ४२०० हजारांचा दंड 'ऑन दी स्पॉट' वसूल केला तर उर्वरित जणांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत दंड जमा करण्याची सक्त ताकीद दिली.
गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाने पोलीस, होमगार्डच्या सहकार्याने सहा वाहनांचा ताफा घेऊन अनसिंग येथे शुक्रवारी पहाटे दरम्यान विशेष मोहिम राबविली. यावेळी उघड्यावर शौचास जाणार्‍या ७७ लोकांना पकडले. त्यांना अनसिंग पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. गोधळ उडू नये म्हणून लोटाबहाद्दरांना पोलीस स्टेशनच्या एका कोठडीत ठेवले होते. लोटाबहाद्दरांचा दंड भरण्यासाठी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व आप्तस्वकियांना पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागली.
यावेळी ३५ व्यक्तींकडुन प्रत्येकी १२oo रुपयाप्रमाणे एकुण ४२०० रुपये रोख स्वरुपात दंड वसुल करण्यात आला. ज्यांच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते, अशा उर्वरीत लोकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत दंड भरण्याची मुभा देण्यात आली. ही मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या नेतृत्वात जिल्हा स्वच्छता कक्ष व पंचायत समितीच्या पथकाने राबविली. अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.                        

Web Title: police take action against people dont use toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.